अहमदाबाद : जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा कंपनीकडून कर्ज घेतले असेल आणि ते पैसे वेळेवर परत केले नसतील तर साहजिकच तुम्हाला रिकव्हरी एजंटचे कॉल येतात. एजंट धमकावून पैसे परत करण्यास सांगतात. पण गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅपद्वारे कर्ज घेणं एका व्यक्तीला महागात पडले आहे. रिकव्हरी एजंटने त्याला कर्ज परत करण्याबाबत इशाराच दिला नाही तर त्याने पत्नीचा न्यूड फोटोही शेअर केला. अहमदाबादच्या बेहारपुरा भागातील एका 34 वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.


एका या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, अहमदाबादमधील ही व्यक्ती कोरोनाच्या काळात मोठ्या आर्थिक संकटात सापडली. त्यामुळे मित्रांच्या सांगण्यावरून त्याने 28 डिसेंबर 2021 रोजी मोबाईल अ‍ॅपद्वारे कर्ज घेतले. त्यांनी 6000 रुपयांचे कर्ज घेण्याचे ठरवले. अनेक चार्जेस वजा केल्यानंतर त्यांना सुमारे 3480 रुपये मिळाले. आठवडाभरानंतर त्यांनी पैसे परत केले.


पैसे परत करूनही धमकावले


आर्थिक अडचणींमुळे या व्यक्तीने 14 वेगवेगळ्या अ‍ॅपच्या माध्यमातून 1.2 लाखांचे कर्ज घेतले. यानंतर त्यांने जानेवारी महिन्यात 2.36 लाखांचे कर्ज व्याजासह परत केले. मात्र पैसे परत करूनही त्याला रिकव्हरी एजंटचे फोन येत राहिले. एवढेच नाही तर ज्या लोकांची नावे त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये होती, त्यांना धमक्याही मिळू लागल्या.


न्यूड फोटो पाठवून धमकी


वसुली एजंटने त्यांच्या पत्नीचा फोटोही कुठूनतरी मिळवल्याचे फिर्यादीत म्हटले. तो फोटो मॉर्फ करून अश्लील बनवला. नंतर हा न्यूड फोटो त्या व्यक्तीला पाठवला. नंतर हा फोटो त्याच्या संपर्क यादीतील नातेवाईकांना पाठवला. सायबर क्राइम पोलिसांनी आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. नग्न फोटो पाठवणे, फसवणूक करणे आणि गुन्हेगारी धमकावल्याचा गुन्हाही दाखल करण्यात केला आहे.