`बक्षीस` म्हणून 5100 रुपये नाही मिळाले, म्हणून बाळ... ; नवजात बालकाच्या मृत्यूनंतर नर्स निलंबित
मन हेलावणारी आणि बेजबाबदारपणाचे दर्शन घडवणारी घटना घडली आहे. नर्सच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये नवजात शिशुचा जन्म झाला. मुलाचा जन्म होताच नर्सने बाळाच्या कुटुंबियांकडे पक्षाची मागणी केली. यासाठी तिने बाळाला 40 मिनिटं नवजात बाळाला कुटुंबापासून दूर ठेवले. यावेळी नर्सने बाळाला टेबलावरच ठेवलं. या दरम्यान बाळाची तब्बेत बिघडली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाती तक्रार सीएमओ यांच्याकडे केली. या प्रकरणात तीन अधिकाऱ्यांच्या टीमनने याबाबत चौकशी केली.
कुर्रा ठाणे क्षेत्रातील ग्राम ओम्हामधील रहिवाशी सुजीप पुत्र धर्मेंद्र यांनी डीएम आणि सीएमओला तक्रारीचे पत्र पाठवले आहे. 18 सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी संजलीला करहलला सीएसची रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ड्युटीवर असलेल्या नर्स ज्योती यांनी प्रसूती दरम्यान हलगर्जीपणा दाखवल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला.
19 सप्टेंबर रोजी संजली यांनी एका बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म होताच 5100 रुपयांची बक्षिसाची मागणी केली. जेव्हा पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्या नर्सने बाळाला टेबलावरच ठेवलं. पैसे मिळेपर्यंत तिने बाळाला तसंच ठेवलं.
प्रसूती दरम्यान बाळाची नीट काळजी घेतली नाही. जवळपास 40 मिनिटांनंतर बाळ आईकडे देण्यात आलं. मात्र तेव्हा बाळाची तब्बेत जास्तच बिघडली होती. यानंतर बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले. बाळाला प्रसूती दरम्यान योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. नर्स आणि रुग्णालयातील मावशी यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला. यामुळे बाळाची आई धक्क्यात आहे.
हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचले आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या घटनेची दखल घेतली. जिल्हा दंडाधिकारी अंजनी कुमार यांनी मैनपुरीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना (सीएमओ) तीन सदस्यीय चौकशी पथक तयार करण्याचे निर्देश देऊन सविस्तर तपासाचे आदेश दिले.
दरम्यान, चौकशी सुरू असताना ज्योतीला तातडीने तिच्या पदावरून हटवण्यात आले. "आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे. नर्सच्या अमानुष वर्तनामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला. कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अधिकारी कटिबद्ध आहेत आणि जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.