IPO Alert | पैसा ठेवा तयार; Nykaa चा IPO या तारखेला होणार खुला; जाणून घ्या सविस्तर
ब्युटी स्टार्टअप ब्रॅंड नायका ऑपरेट करणारी कंपनी FSN ई-कॉमर्स वेंचर्स लिमिटेडचा आयपीओ 28 ऑक्टोबरला खुला होणार आहे
मुंबई : ब्युटी स्टार्टअप ब्रॅंड नायका ऑपरेट करणारी कंपनी FSN ई-कॉमर्स वेंचर्स लिमिटेडचा आयपीओ 28 ऑक्टोबरला खुला होणार आहे. कंपनीने आयपीओसाठी 1085 रुपये प्रति शेअऱच प्राइज बॅंड निश्चित केला आहे. रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस(RHP)नुसार आयपीओचे सब्सस्क्रिप्शन तीन दिवसांपर्यंत खुला राहणार आहे आणि तो 1 नोव्हेंबरला बंद होणार आहे. FSN ई कॉमर्स वेंचर्स ब्युटी आणि वेलनेस प्रोडक्ट नायका (Nykaa)ची ऑनलाईन विक्री करते. कंपनीची 5,355 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे.
OFC च्या माध्यमातून जे शेअर विकले जाणार आहेत, त्यामध्ये प्रमोटर संजय नायर फॅमिली ट्रस्ट ऍँड शेअर होल्डर्स - TPG Growth IV SF प्रायवेट लिमिटेड, लाइटहाउस इंडिया फंड III, लिमिटेड, लाइटहाउस इंडिया III इम्प्लॉई ट्रस्ट, योगेश एजेंसीज ऍंड इन्वेस्टमेंट्स, जेएम फायनान्शिएल ऍंड इन्वेस्टमेंट कंसल्टेंसी सर्विसेज आणि अन्य वयक्तिक शेअरहोल्डर सामिल आहेत. मार्केट रेग्युलेटर सेबीने 12 ऑक्टोबरला IPO ला मंजूरी दिली होती.
कंपनीच्या ड्राफ्ट पेपर्सनुसार, Nykaa IPO तून उभारण्यात आलेली रक्कम कंपनीचा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. सोबतच कंपनीवरील कर्ज करण्याचा देखील कमी करण्याचे नियोजन असणार आहे. व्यवसाय़ वाढवण्यामध्ये रिटेल स्टोअर्स आणि नवीन वेअर हाऊस बनवणे इत्यादी गोष्टी करू शकतात.
2012 मध्ये कंपनीची स्थापना
फाल्गुनी नायर (Falguni Nayar)यांनी 2012 मध्ये FSN ई कॉमर्स वेंचर्स लिमिटेडची स्थापना केली आहे. हा एक ऑनलाईन कंज्युमर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे. ही कंपनी कंज्युमर्सला लाइफस्टाइल प्रोडक्ट्स, ब्युटी, पर्सनल केअऱ आणि फॅशन प्रोडक्ट डिलिवरी करते. यामध्ये कंपनीने स्वतः बनवलेल्या ब्रॅंडचे प्रोडक्ट सामिल आहेत.