मुंबई : आम्हाला राज्य सरकारमध्ये (State Government) सामावून घ्यावं, या मागणीसाठी अनेक कर्मचाऱ्यांनी (Employee) सरकार विरोधात आंदोलन केलं होतं. अखेर कर्मचाऱ्यांच्या या लढ्याला यश आलं आहे. तब्बल हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना (contract employee) राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी (Diwali 2022) मोठं गिफ्ट मिळालं आहे. (odisha government will abolish contractual system of employment and regularise the services of all its contractual employees)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशा सरकारने (Odisha Government) हा निर्णय घेतला आहे.  ओडिशा सरकारने राज्यातील जवळपास 57 हजार कर्मचा-यांना नियमत करणार असल्याचं मुख्यमंत्री नवीन पटनायक (Chief Minister Naveen Patnaik) यांनी सांगितलं. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून नोकरी नियमित करण्याची मागणी केली होती.


कंत्राटी नियुक्ती प्रणाली पूर्णपणे (Contractual recruitment system) रद्द करण्याच्या मागणीसाठी मोठ्या अनेक आंदोलनही करण्यात आली होती. आज मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर एका महिन्यात कंत्राटी नियुक्तीचे नियम रद्द करण्याचे आश्वासन पटनायक यांनी दिले. या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला.