भुवनेश्वर : ओडिसाची राजधानी भुवनेश्वर येथील बोमीखल येथे बांधकाम सुरू असलेला फ्लायओव्ह कोसळला. यात एक जण ठार तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना भुवनेश्वर येथील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी ही घटना घडली. अद्यापही चार लोक माती आणि सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना घडली तेव्हा १५ कामगार काम करत होते. घटनेची माहिती कळताच ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रूपये तर, जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे. तसेच, या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल असेही पटनायक यांनी सांगितले आहे.



आयुक्त ए बी ओत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यमी सत्य पटनायक (वय-३९) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा उद्यमी पटनायक आपल्या मुलीसोबत फ्लायओव्हरच्या खाली उभे असल्याची माहिती ओत्ता यांनी दिली.