मुंबई :  अवघ्या एका क्लिकवर दारात रिक्षा- टॅक्सीची सेवा देणारी ओला कॅब दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता आऊटस्टेशन म्हणजेच एका शहरातून दुसर्‍या शहरात प्रवास करणार्‍यांसाठी 'गुगल'सोबत एक करार केला आहे. 


'ओला' ने दिलेल्या माहितीनुसार, आऊट स्टेशन प्रवास करणार्‍यांसाठी या नव्या सेवेमुळे प्रवाशांना गुगल मॅपचा वापर करणं अधिक सुकर होणार आहे. परिणामी टॅक्सी / वाहन शोधणं आणि बुक करणंही सोपे होणार आहे.  


'दोन शहरांमध्ये प्रवास करणारे आता गुगल मॅपवरही ओला आऊटस्टेशन या पर्यायांचा वापर  करू शकणार आहेत.' पर्याय निवडताना त्यांना अ‍ॅटोमॅटिक ओला अ‍ॅपवर रिडिरेक्ट केले जाईल आणि त्यांना बुकिंग करणं सुकर होईल.' असे 'ओला' ने सांगितले आहे.  


कंपनीने सांगितल्यानुसार, या नव्या सेवेमुळे  २३ शहरांमधील प्रवासी तब्बल २१५ मार्गांवरील कॅब बुक करणार आहेत. कालांतराने ही सुविधा ५०० मार्गांसाठी खुली केली जाईल.