Old Coins Online Sale: अनेकांना जुनी नाणी साठवण्याचा छंद असतो. तुमचा हा छंद तुम्हाला करोडपती बनवू शकतो असं कोणी सांगितलं तर? हो. कारण जुन्या, दुर्लभ नाण्यांना बाजारात खूप किंमत आहे. यामध्ये जुन्या नोटा आणि नाण्यांचाही समावेश आहे. जर तुम्ही जुनी नाणी आणि नोटा जमा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जुन्या नोटा आणि नाणी तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. कारण जुन्या नोटा आणि नाण्यांची ऑनलाइन विक्री होत आहे. जुनी नाणी आणि नोटा ऑनलाइन विकून चांगली कमाई करू शकता. तुम्ही 1 आणि 2 रुपयांची जुनी नाणी आणि चलनातून बाहेर पडलेल्या 1, 2 आणि 5 रुपयांच्या नोटा चांगल्या किमतीत विकून पैसे कमवू शकता आणि हजारो रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या घरी दुर्मिळ नोटांचे बंडल पडलेले असतील तर ते तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण हे बंडल विकून तुम्ही चांगली रक्कम जमा करू शकता आणि श्रीमंत होऊ शकता. असे असले तरी यामध्ये काही नियम आणि अटी आहेत. जुन्या नोटांमध्ये काही खास वैशिष्ट्ये गरजेचे असते. त्याबद्दल जाणून घेऊया. 


1977 चे एक रुपयाचे नाणे खूप मौल्यवान 


तुमच्याकडे 1977, 1978 किंवा 1979 चे एक रुपयाचे नाणे असेल तर तुम्हाला 45,000 रुपयांपर्यंत मिळू शकते, असे सांगण्यात येते. परंतु यासाठी काही अटी आहेत. त्यावर तत्कालीन वित्त विभागाचे सचिव हिरुभाई एम पटेल यांची सही असणे आवश्यक असते, असे सांगण्यात आले आहे. 


हिरुभाई एम पटेल हे नाणे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या काळातील आहे. याशिवाय माता वैष्णोदेवीचे चित्र असलेल्या 10 रुपयांच्या नाण्यालाही ऑनलाइन मागणी असते. 


तुमच्याकडे आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांच्या सही असलेली आणि 000 आणि 786 क्रमांक असलेली 100 रुपयांची नोट असल्यास तुम्ही ती 1हजार 999 रुपयांना ऑनलाइन विकले जाते. यासोबतच ओएनजीसीच्या सन्मानार्थ जारी केलेले 10 रुपये 200 रुपयांना विकले जाते. 


कायदा काय सांगतो?


भारताच्या कायद्यानुसार आणि भारतीय नाणे कायद्यानुसार, जर तुमच्याकडे जुने किंवा विशेष क्रमांकाचे नाणे असेल आणि ते तुमच्या मालकीचे असेल, तर तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या किंमतीला विकू शकता. मात्र, अशी नाणी तुम्ही साठवू शकत नाही, असेही या कायद्यात लिहिले आहे. म्हणजेच तुमच्याकडे अशी हजारो-लाखांची नाणी आहेत, असे होऊ नये, असे झाल्यास साठेबाजीप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागू शकतो.


(Desclaimer: नोटा आणि नाण्यांबद्दल दिलेली सर्व माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. जुन्या नोटांची विक्री आणि खरेदी करताना काळजी घ्या, अन्यथा फसवणूक होऊ शकते. )