बांदा : साप दिसला तरी अंगावर काटा येतो आणि भीतीने तोंडातून शब्द फुटत नाही. मात्र एक संतापलेल्या तरुणानं चक्क सापाला मारून खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. साप चावला त्याचा संताप अनावर झाल्याने एका व्यक्तीनं चक्क सापाला मारून खाल्ल्याचं समोर आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांदा इथे घडली आहे. सापालाच मारून खाणाऱ्या या व्यक्तीला सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 


बांदा येथील कामसीन पोलीस स्टेशन हद्दीतील सयोदा गावात राहणाऱ्या व्यक्तीला घराजवळ काम करताना साप चावला. साप चावल्याने त्या व्यक्तीचा संताप अनावर झाला. त्याने सापाला ठार मारलं आणि त्यानंतर त्याला खाल्लं. ही माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.


याची माहिती नातेवाईकांना मिळतात या व्यक्तीला तातडीनं स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांना बांदा इथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याच्या जीवाचा धोका टळल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.