सावधान! ट्रेनच्या दारात उभं राहून प्रवास करताय? तुमच्यासोबतही हे घडू शकतं, पाहा व्हिडीओ
तुम्हालाही ट्रेनच्या दारात उभं राहून प्रवास करायची सवय असेल तर एकदा हा व्हिडीओ पाहाच
कानपूर : ट्रेनमधून प्रवास करताना दारात उभं राहून प्रवास करू नये असं सतत सांगितलं जातं. त्यामुळे बाहेर घात घालून बसलेल्या अज्ञातांना नुकसान करण्याची संधी मिळते. हे सांगूनही बऱ्याचदा प्रवासी ऐकत नाही आणि मग अनर्थ होतात.
ट्रेनच्या दारात बसलेल्या या प्रवाशांना पाहा, कानात हेडफोन घालून मस्त मोबाईलवर गाणी ऐकत बसले आहेत. त्यांना जराही कल्पना नाही की आपल्यासोबत पुढे काय होणार आहे. पुढे ब्रीजवर लपून बसलेल्या चोरट्यांनी ट्रेनच्या दारात बसलेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावला.
तरुणाला दोन सेकंद आपल्यासोबत काय घडलं हे समजण्यात गेली. त्यानंतर लक्षात आलं फक्त कानात हेडफोन आहेत. हातातील मोबाईल हिसकावला गेला आहे. डोळ्याची पापणी लवण्याआधी झटक्यात चोरट्यांनी या तरुणाच्या हातातील मोबाईल लंपास केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही धक्कादायक घटना बिहारच्या बेगूसराय परिसरात घडली आहे. ट्वीटरवर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दुसरा तरुण व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात मश्गुल असल्याचं दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चोरटे पुलाच्या खांबाला एका दोरीच्या मदतीने बांधतात. पायाच्या मदतीने संतुलन सांभाळतात. एक सुरक्षित अंतर ठेवून ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या वस्तू चोरण्याचं हे काम करतात. त्यामुळे तुम्हालाही जर ट्रेनच्या दरवाजात उभं राहून प्रवास करायची सवय असेल तर सावध राहा.