नवी दिल्ली : आपल्या लहानपणी किंवा आताही  रुबिक्स क्यूब कधी तुम्ही खेळून पाहिलंय का? बऱ्याचदा ते आपल्याला पहिल्या प्रयत्नात जमत नाही. कधी दुसऱ्या फटक्यात जमतं. पण हा खेळ खेळणं म्हणजे बुद्धीचा कसं लागण्यासारखं आहे. त्याचवेळी कमी वेळेत अगदी उत्तम पद्धतीनं हा खेळ खेळणाऱ्यांचा कस लागतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिथे एक काम आपल्याला पूर्ण क्षमतेनं करायचं असतं तिथे एका क्षमतेनं सायकल चालवता चालवता 14.32 सेकंदात रुबिक्स क्यूबचं कोडं सोडवलं आहे. त्याने हा विक्रम 14.32 सेकंदात केला असून विक्रम रचला आहे. त्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की रुबिक्स क्यूब हातात घेऊन ते सोडवत आहे. एककडे तो सायकल चालवत आहे तर दुसरीकडे हातात रुबिक्स क्यूब घेऊन सोडवत आहे. जयदर्शन वेंकटेशन असं या चिमुकल्याचं नाव आहे. हे त्याने 14.32 सेकंदात सोडवलं आहे त्याच्या या अनोख्या कौशल्याचं सर्वजण कौतुक करत आहेत. 


या चिमुकल्याचा व्हिडीओ 36 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका युजरने भारताचं नाव हा मुलगा रोशन करतोय अशी कमेंट देखील दिली आहे. या मुलाचं कौतुक सोशल मीडियावर सर्वजण करत आहेत. 


सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत हसतात. कधी खळखळून हसवणारे तर कधी नकळत डोळ्यात पाणी आणणारे. पण कोरोना आणि लॉकडाऊनच्या निमित्ताने अनेकांनी आपलं खरं कौशल्य दाखवणारे व्हिडीओ देखील केले. त्या व्हिडीओचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे.