Omicron किती धोकादायक? WHO कडून महत्त्वाची माहिती
खरंच Omicron एवढा घातकं आहे का? किती भीती बाळगायला हवी? WHO ने दिलेल्या माहितीनं मिळणार दिलासा
मुंबई: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात दहशत निर्माण झाली आहे. काही देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली आहे. तर दुसरीकडे भारतातही आता ओमायक्रॉनचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाचं टेन्शन वाढलं आहे.
या सगळ्या परिस्थितीमध्ये एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या नव्या व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञ अद्याप कोणत्याही अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले नाही. मात्र डेल्टा आणि डेल्टा प्लस यापेक्षा हा व्हेरिएंट धोकादायक असल्याचं सांगण्यात आल्याने दहशत पसरली आहे.
काही तज्ज्ञांच्या मते या नव्या व्हेरिएंटचं वर्णन सुपर माईल्ड असं करण्यात आलं आहे. ज्या पहिल्या चार रुग्णांमध्ये या नव्या व्हेरिएंटची लक्षणं आढळली ती सर्व सौम्य स्वरुपाची होती. रुग्ण यातून लवकर बरा होऊ शकला. इतकच नाही तर या व्हेरिएंटची लागण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. त्यामुळे हा सुपर माईल्ड असल्याचं काही तज्ज्ञ आणि डॉक्टरांचं मत आहे.
Omicron ची लागण होऊ मृत्यू झाल्याची अद्याप घटना समोर आली नाही. त्यामुळे हा नवा व्हेरिएंट अति सैम्य असल्याची तज्ज्ञांनाही खात्री आहे. असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
याच पार्श्वभूमीवर WHO ने अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्यांना आळा घालावा असं आवाहन केलं आहे. घाबरण्याऐवजी आशावादी राहावं असंही जागतिक आरोग्य संघनेकडून आवाहन करण्यात आलं आहे.
दक्षिण आफ्रिकेतून आलेले सर्व अहवाल डेल्टापेक्षा ओमायक्रॉन सौम्य असल्याचे दाखले देतात त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मात्र बेसावध राहून देखील चालणार नाही. मात्र अफवांवर आळा घालण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघनेनं केलं आहे.
युनायटेड स्टेट्समधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक डॉ. फ्रान्सिस कॉलिन्स यांनी सांगितले की, नवीन प्रकार पूर्वीच्या कोविड-19 व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक आहे असे सूचित करणारा कोणताही डेटा अद्याप उपलब्ध नाही.
संसर्गाचा धोका मात्र अधिक आहे. या व्हेरिएंटमध्ये 30 हून अधिकवेळा म्युटेशन झालं आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या जवळपास दुप्पट म्युटेशन झाल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे तो अधिक संसर्गजन्य बनला आहे. यावर अधिक सखोल अभ्यासाठी गरज असल्याचंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.