नवी दिल्ली : पाकिस्तानचे नापाक कृत्य सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून बुधवारी गोळीबार करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरएस पुरा सेक्टरमध्ये करण्यात आलेल्या या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला. तर, ३ जवान आणि तीन नागरिक जखमी झाले.


पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. शहीद जवानाचा बदला घेत भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे तीन सैनिक मारले गेले. गुरुवारी दुपारपर्यंत हा गोळीबार सुरुच होता. 


पाकिस्तानकडून अरनिया क्षेत्रात करण्यात आलेल्या हल्ल्यात ग्रामस्थांचं नुकसान झालं आहे. तसेच तीन नागरीकही जखमी झाले आहेत. 


बुधवारी रात्री गोळीबार 


बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानने आरएस पुरा सेक्टरमध्ये बुधवारी रात्री जवळपास ११ वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला. या हल्ल्याला प्रतुत्तर देत भारतीय सैन्यानेही गोळीबार केला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला तर, तीन गंभीर जखमी झाले.



जंगलात लावली आग


गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानने सीमेवर असलेल्या जंगलातही आग लावली. या आगीचा सहारा घेत पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करत आहे.