सिडनी : वाहन चालवताना फोनचा वापर न करण्याचं अनेकदा सांगितलं जातं. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी जनजागृतीही केली जाते. पण अनेकदा वाहतुकीच्या या नियमांची पायमल्ली केली जाते. अनेक चालक वाहन चालवताना फोनवर बोलताना, व्हिडिओ चित्रीत करताना दिसतात. संशोधकांनी याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्यामध्ये स्नॅपचॅटचा वापर हे सर्वात मोठं कारण असून, ६ पैकी १ तरुण ड्रायव्हिंग करत असताना स्नॅपचॅटचा वापर करत असल्याचं संशोधकांकडून सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहींना ही गोष्ट पटली असून, ते ड्रायव्हिंग करत असताना स्नॅपचॅट केवळ पाहण्यासाठी आणि इतरांच्या मेसेजला रिप्लाय करण्यासाठी वापरत असल्याचं समोर आलं आहे.


तर, संशोधनातील इतर १५ टक्के लोकांनी, ड्रायव्हिंग करताना त्यांनी या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, स्नॅपचॅटचा वापर व्हिडिओ आणि फोटो पाठवण्यासाठीही केला असल्याचं सांगितलं.


ऍक्सिडेंट ऍनालिसिस ऍन्ड प्रिव्हेंशन (accident analysis and prevention) नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या निरिक्षणात, क्विंसलँड यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या (queensland university of technology) (क्यूयूटी) संशोधकांनी, रस्त्यांवर लोकप्रिय सोशल मीडिया अॅप- स्नॅपचॅटचा वापर करणाऱ्या १७ ते २५ वयोगटातील ५०३ चालकांचा सर्व्हे केला. रिसर्चर वेरिटी ट्रलवने सांगितलं की, सर्व्हेमध्ये सामिल १६ टक्के लोकांनी या गोष्टीचा स्वीकार केला आहे की, ते वाहन चालवताना स्नॅपचॅटचा वापर करतात.


स्नॅपचॅटचा वापर करणाऱ्या ७१ टक्के लोकांनी ते केवळ रेड लाइट असल्यावरच, स्नॅपचॅटचा वापर करत असल्याचं सांगितलं. तर इतर वापरकर्त्यांनी या अॅपचा वापर ड्रायव्हिंग करत असताना कधीही, कुठेही करत असल्याचं सांगितंल.