मुंबई : भारतात कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा वाढत आहे. मंगळवारी गेल्या 24 तासात देशात कोरोना-संक्रमित 3,449 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, अमेरिकेतील अव्वल जागतिक आरोग्य संशोधन संस्थेने असा अंदाज लावला आहे की, कठोर उपाययोजना न केल्यास 1 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात 10 लाखाहूनही जास्त कोरोनाने मृत्यू होऊ शकतो. संस्थेने यापूर्वी या तारखेपर्यंत 960,000 मृत्यूचा अंदाज लावला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्राणघातक रोगामुळे, गेल्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येत 78% वाढ झाली आहे. अमेरिकेत, बिडेन प्रशासनातील उच्च अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जॅक सलिव्हियन यांनी एबीसी न्यूजला सांगितले की, भारतात कोरोना नियंत्रणा बाहेर गेला आहे.'


कोरोनाच्या दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीत अमेरिकेने भारताला 100 कोटी डॉलर्सची मदत पाठविली आहे. दरम्यान, कोरोना संक्रमणाची साखळी पुढे जाऊ नये म्हणून अमेरिकेने मंगळवारपासून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना बंदी घातली. हे निर्बंध अमेरिकेत येणाऱ्या सर्वांसाठी लागू केले गेले आहेत परंतु अमेरिकन नागरिक, ग्रीन कार्डधारक, महाविद्यालये आणि विद्यापीठांत प्रवेश घेतलेले विद्यार्थी, काही शिक्षणतज्ज्ञ आणि व्यावसायिक यांना सवलत देण्यात आली आहे.


इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME)आपल्या पॉलिसी ब्रीफिंगमध्ये म्हटले आहे की, "आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी कठोर उपाययोजना तसेच सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याबाबत भारताची परिस्थिती खूपच वाईट दिसते."


या संस्थेचा अंदाज आहे की 1 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात 1,019,000 लोकांचा मृत्यू होऊ शकतो. हे अंदाज 25 ते 30 एप्रिल दरम्यानच्या आकडेवारीवर आधारित आहे. 


इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनच्या म्हणण्यानुसार, जर पुढच्या आठवड्यात 95% परिस्थिती नियंत्रणात आणली तर हा आकडा 73 हजारांनी कमी होऊ शकतो.