प्रद्युम्न हत्या प्रकरणात आणखी एक खुलासा
गुरुग्राम प्रद्युम्न हत्या प्रकरणात आणखी एक गोष्ट पोलिसांना सापडली आहे. यामध्ये आणखी एक खुलासा झाला आहे.
नवी दिल्ली : गुरुग्राम प्रद्युम्न हत्या प्रकरणात आणखी एक गोष्ट पोलिसांना सापडली आहे. यामध्ये आणखी एक खुलासा झाला आहे.
सीबीआय आणखी एका विद्यार्थ्याला अटक करु शकते. हा विद्यार्थी देखील या हत्येमध्ये सहभागी असल्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.
सीबीआयने त्याच्या घराचं लोकेशन देखील शोधलं आहे. सीबीआयने आधीचं 11 वीच्या विद्यार्थ्याला या प्रकरणात अटक केली आहे. जुवेनाईल कोर्टाने आरोपीला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
गुरूवारी संध्याकाळी सीबीआय आरोपीला त्या दुकानावर घेऊन गेली जेथून त्याने खुनासाठी सुरा खरेदी केला होता. 11 वीच्या या आरोपी विद्यार्थ्याला मात्र दुकानदाराने ओळखलं नाही.
दुकानदार म्हणतो की, दुकानावर दररोज अनेक लोक सामान खरेदी करण्यासाठी येतात. अडीज महिन्यापूर्वी हा विद्यार्थी सुरा खरेदी करण्यासाठी आला होता की नाही हे मी नाही सांगू शकतं.