नवी दिल्ली : देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या २४ तासात कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या कोरोनाचे ४,२२१ रुग्ण आहेत, तर आतापर्यंत ११७ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचे ३२६ रुग्ण बरे झाले आहेत. मागच्या २४ तासात कोरोनाचे ३५४ नवे रुग्ण आढळले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने कोरोना व्हायरसबाबत महत्त्वाचं संशोधन केलं आहे. एका व्यक्तीकडून ३० दिवसात ४०६ व्यक्तींना कोरोना होऊ शकतो, असं संशोधन आयसीएमआरने केल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. लॉकडाऊन केलं तर एका व्यक्तीकडून २.५ लोकांना संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.





कोरोनाचा सामना करण्यासाठी २५ हजार रेल्वे डब्यात ४० हजार आयसोलेशन बेड तयार केले आहेत. बेड तयार करण्याचं काम देशभरात १३३ ठिकाणी सुरू आहे. आत्तापर्यंत १ लाख ७ हजार टेस्ट केल्या आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले.