One Rupee Note: सध्याच्या जगात कुठल्या गोष्टीला कधी मागणी वाढेल हे सांगता येतं नाही. आजकाल पुरातन काळातील वस्तूंना (Antiquities) मोठ्या प्रमाणात मागणी असते. अनेक जण जुन्या वस्तूंनी घर (house) सजवतात. त्यामुळे मार्केटमध्ये जुन्या वस्तू आणि गोष्टींना चांगली किंमत मिळते. जर तुम्हाला जुन्या नोटा किंवा नाणी जमा करायची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) नोटबंदी (demonetisation) केल्यानंतर अनेक नोटा या संपुष्टात आल्या. अशातच जुन्या नोटा (Old notes) आणि नाण्यांच्या (coins) किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे जुन्या आणि अनोखी नोट असेल तुम्ही लाखो रुपयांपर्यंव विकून श्रीमंत होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच नोटेबद्दल सांगणार आहोत, जिच्या किंमतीचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. (one rupee note sold thousands rupees nm )


अबब!


तुमच्याकडे दुर्मिळ एक रुपयांची नोट (rare one rupee note) असेल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.  एक अनोखी नोट (unique note) समोर आली असून या नोटेची किंमत 42 हजार रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, ही नोट सध्या 13 हजार रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. त्याची खरी किंमत 55 हजार रुपये ठेवण्यात आली होती. असे काही लोक आहेत जे अशा नोटा विकत घेतल्यानंतर त्या जास्त किंमतीला विकतात. 


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या नोटेची किंमत एवढी का आहे आणि त्यामागील कारण काय आहे. तर ही नोट सुमारे 30 वर्षे जुनी आहे. या एक रुपयाच्या नोटेचा क्रमांक 786786 असून तिचा उपसर्ग 56S आहे. त्यावर तत्कालीन वित्त सचिव एस वेंकीतारामन (Finance Secretary S Venkitaraman) यांचीही स्वाक्षरी आहे. अशा फॅन्सी नंबरच्या नोटा खरेदी करण्यासाठी अनेकजण तयार असतात. 


जर तुमच्याकडे असे अद्वितीय क्रमांक आहेत ते अशा ऑनलाइन वेबसाइटवर (Online website) खाते तयार करू शकतात आणि त्या चांगल्या किंमतीत विकू शकतात. या नोटा आता फॅशनेबल (fashionable) नसल्या तरी त्यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक संकेतस्थळांवर या नोटांचा लिलाव (Auction of notes) होत असून चांगली रक्कम मिळत आहे.