Driving licence बनवीने झालं सोपं, फक्त एका कागद पत्रावर होणार काम
माहिती मंत्रालयाने (Information Ministry) काही नवीन नियम आणले आहेत, ज्यामुळे बरीच कामे सोपी झाली आहेत.
मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आणि वाहन नोंदणी संबंधित काम सोपे झाले आहे. खरं तर माहिती मंत्रालयाने (Information Ministry) काही नवीन नियम आणले आहेत, ज्यामुळे बरीच कामे सोपी झाली आहेत. याचं नोटिफिकेशन सरकारनेही दिलं आहे, ज्यामध्ये वाहन नोंदणीमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी आधार (Aadhaar) वापरला जाईल.
नव्या नियमानुसार आधार डेटा (Aadhaar Data) आता ऑनलाईन सेवांमध्ये वापरला जाईल. यामध्ये लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स (Learning Driving licence), ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण Driving licence Renewal), वाहन नोंदणी आणि संबंधित कागदपत्रे बदलण्यासाठी वापरला आधार (Aadhaar) वापरला जाईल.
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार हे बदल झाले आहेत. यामागील हेतू ड्रायव्हिंग लायसन्स आणि कार नोंदणीमध्ये बनावट पत्त्याची कागदपत्रे वापरण्यापासून थांबवायचे आहे. आता लोक घरातूनच त्यांचं काम पूर्ण करू शकतील. एखाद्यास ऑनलाईन सेवा मिळवायच्या असतील तर आधार Aadhaar ऑथेंटिकेशन वापरुन तुमचे काम होईल.