IPO Upadate | बाजारात Byju`s चा IPO येणार; 4500 कोटी उभारण्याची योजना
भारतातील मोठी स्टार्टअप आणि ऑनलाईन एज्युकेशन प्रोवायडर Byju`s ने आपला इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO)आणण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : भारतातील मोठी स्टार्टअप आणि ऑनलाईन एज्युकेशन प्रोवायडर Byju's ने आपला इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO)आणण्याच्या तयारीत आहे. Byju's चा IPO पुढील वर्षी येऊ शकतो. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार आयपीओची साईज 4500 कोटींची असू शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीओच्या आधी Byju's इक्विटी आणि डेटच्या समान भागातून फंड मिळवू शकते. कंपनी देशातील सर्वात जास्त व्हॅल्यू असलेली स्टार्टअप आहे. ही तेजीने ग्रोथ करणारी ऑनलाईन एज्युकेशन प्रोवायडर कंपनी आहे.
आयपीओ मॅनेज करण्यासाठी कंपनीने मॉर्गन स्टॅनली, सिटी ग्रुप, जेपी मार्गन चेसशी चर्चा सुरू आहे. शिक्षक असलेले बायजू रविद्र यांनी ही कंपनी बनवली होती. आता त्यांचे शेअर बाजारात लिस्ट होण्याचे नियोजन आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, Byju's ने आपल्या आयपीओसाठी मार्केट रेग्युलेटर सेबी(SEBI)कडे जुलैमध्ये कागदपत्र जमा करू शकते.
Byju's ने ऑनलाईन परीक्षांची तयारी करणारे प्लॅटफॉर्म Gradeup चे अधिकग्रहण केले आहे. याआधी कंपनीने Whitehat Jr आणि आकाश एजुकेशनल सर्विसेस आणि ग्रेट लर्निंगचेही अधिग्रहण केले होते.