Food Delivery Boy Viral Video : धकाधकीच्या जीवनात आणि महिला वर्गही आजकाल ऑफिसला जात असल्याने बाहेरून जेवण बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळेच आज फूड डिलीव्हरी अॅप्स मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आहेत. या अॅप्सद्वारे कोट्यावधींच्या संख्येने रोज सेकंद सेकंदा अनेक पार्सल इकडून तिकडे जात असतात. ग्राहकांचा कल त्यांचा अॅप्सकडे वाढावा म्हणून यावर वेगवेगळे ऑफर दिले जातात. त्यातील एक ऑफर आहे जर ठरलेल्या वेळे डिलीव्हरी बॉय (Food Delivery Person)पार्सल घेऊन आला नाही तर तुम्हाला जेवण्याचे पैसे द्यावे लागणार नाही.  (Social Media Viral Video)


डिलीव्हरी बॉय उशीर झाला अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका डिलीव्हरी बॉयचा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन वाऱ्यासारखा पसरताना दिसतं आहे. ज्यामध्ये एक महिला आणि तरुणी डिलीव्हरी बॉयला मारामारी करताना दिसतं आहे. ती महिला त्या तरुणीची आई असावी. मिळालेल्या माहितीनुसार फूड डिलीव्हरी करण्यासाठी या तरुणाला उशीर झाला. त्यामुळे संतापलेल्या माललेकीने त्याला तुफान झोडलं. 


बाजूलाच कारमध्ये असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ बनवला. त्याच व्यक्तीसोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण त्या मायलेकी त्या डिलीव्हरी बॉयला जबरदस्त मारहाण केली. उशीर होऊनही फूडचे पैसे त्या डिलीव्हरी बॉयने मागितल्यामुळे त्या दोघी वैतागल्या होत्या. त्यामुळे त्यांचामध्ये वाद झाला आणि त्या दोघींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. (Online Food Delivery late delivery boy beaten by girl woman viral video on Social Media trending now )


व्हिडीओ तुफान व्हायरल


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर Arhant Shelby या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही क्षणातच तो व्हायरल झाला. या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. 



या व्हिडीओमागीत सत्यता अजून समोर आली नाही. फूड डिलीव्हरी बॉयला उशीर झाला याच कारणावरुन हा वाद झाला की अजून काही याबद्दल अजून काही समजलं नाही आहे. त्याशिवाय या व्हिडीओ नक्की कुठल्या शहरातील आहे हेही कळलेलं नाही.