Inspirational Story : लॉकडाऊनमध्ये (Lockdown) एकिकडे अनेकांच्या नोकऱ्या (Jobs) गेल्या आहेत, तर दुसरीकडे अनेकांनी व्यवसाय देखील थाटला होता. या व्यवसाय थाटलेल्यांपैकी अनेकांना मोठे यश आले होते. अशाच एका यशाची कहानी आता समोर आली आहे. एका बारावी पास तरूणाने लॉकडाऊनमध्ये भाजीचा व्यवसाय (Vegetable Buisiness) थाटला. हायटेक पद्धतीने भाजी विकून त्याने हा व्यवसाय वाढवला आहे. आता या व्यवसायातून तो वर्षाकाठी 4 कोटींची उलाढाल करत आहे. त्याची ही प्ररेणादायी कहानी एकूण अनेकांना प्रेरणा मिळत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या अंगी जर जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश तुम्ही सहज मिळवू शकता. याचेच उदाहरण म्हणजे शुभम बिलथरे (shubham belthare) आहे. या तरूणाने भाजीचा व्यवसाय करून मोठी झेप घेतली आहे.लॉकडाऊन सारख्या कठिण परिस्थितीत त्याने हा व्यवसाय करून यश संपादन केले आहे.  


कोण आहे तरूण? 


शुभम (shubham belthare) हा मध्यप्रदेशातील सागर येथील रहिवासी आहे. त्याने बारावी पास केली आहे. त्यानंतर कॉलेजची फी न भरल्यामुळे त्याला बी.टेकचे शिक्षण सोडावे लागले होते. शिक्षण सुटल्यानंतर त्याने 10 ते 12 खाजगी ठिकाणी नोकरी केल्या. मात्र या नोकरीत 10-12 हजार रूपयाची तुटपूंजीच कमाई होत होती. त्यामुळे त्याने नोकरी न करता व्यवसाय थाटण्याचा निर्णय घेतला होता.  


कसा सुरु केला स्टार्टअप?


शुभम (shubham belthare) लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकला होता. यावेळेस शहरात लॉक़डाऊन लागल्यामुळे अनेक लोकांची पंचाईत झाली होती. घराचे सामान कसे भरायचे, बाजारातून भाजी कशी आणायची असे अनेक प्रश्न त्यांना सतावत होते. त्यामुळे शहरी भागात ऑनलाईन होम डिलिव्हरीची मागणी देखील वाढली होती. नागरीक ऑनलाईन भाजीपालाही मागवू लागले होते. इथूनच त्याला कल्पना सुचली आणि त्याने भेंडी बाजार (Bhendi Bazar) नावाचा स्टार्टअप सुरु केला.सुरूवातीला घरोघरी जाऊन त्याने नागरीकांना आपल्या व्यवसायाबद्दल माहिती दिली. त्यानंतर 10-12 ग्राहक वाढले. असे एक एक करून नंतर त्याने आपला व्यवसाय वाढवला.


किती नफा कमवतो?   


शुभम (shubham belthare) आता भाजी व्रिक्रीच्या स्टार्टअपमधून वर्षाला तब्बल 4 कोटींची उलाढाल करतो. तसेच त्यातील सुमारे 1.5 कोटींचा नफा कमावतो आहे. आज त्याचे 4 स्टोअर आहेत. त्यापैकी एक सिधगाव येथे आहे तर उर्वरित 3 दुकाने मक्रोनिया परिसरात आहेत. 


दरम्यान शुभमच्या (shubham belthare) यशाची कहाणी अनेक तरूण,तरूणींसाठी प्रेरणादायी आहे. शुभमकडून प्रेरणा घेऊन अनेक जण आता व्यवसायात उतरण्याची शक्यता आहे.