गुजरात : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आणि मृत्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आता तर अवघ्या १४ महिन्यांच्या बाळाचा कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे. जामनगरमध्ये या बालकाने अखेरचा श्वास घेतला. या बालकाला ५ एप्रिल रोजी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान अखेर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. कोरोना या धोकादायक विषाणूचा संसर्ग  वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना लवकर बळावण्याची शक्यता असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे लहान मुलांचा मृत्यू होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या बालकाला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात तेव्हा त्याची प्रकृती फारच चिंताजनक होती. मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याला व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आलं होतं. पण त्याच्या शरीराने उपचाराला प्रतिसाद देणं बंद केलं होतं. 


महत्त्वाचं म्हणजे राज्यात कोरोनामुळे मृत पावणारा हा सर्वात कमी वयाचा रुग्ण आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात  पहिल्या क्रमांकावर आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या अहवालानुसार, राज्यात ८६९ रुग्णांची नोंद झाली असून ५२ जणांचा  मृत्यू झाला आहे.