ओपिनियन पोल: उत्तर प्रदेशात आज निवडणुका झाल्या तर...
आज काय आहे उत्तर प्रदेशच्या जनतेच्या मनात?
नवी दिल्ली : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सगळेच पक्ष यासाठी कामाला लागले आहेत. भाजप, काँग्रेस सोबतच इतर प्रादेशिक पक्षांनी देखील कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी युपी हे राज्य फार महत्त्वाचं मानलं जातं. या राज्यात २ मोठे प्रादेशिक पक्ष आहे. सपा आणि बसपाने लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केल्याने युपीमधील निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे. युपीमधील जनता देखील या सगळ्या घडोमोडींवर नजर ठेवून आहेत. प्रियंका गांधी या देखील आता सक्रिय राजकारणात आल्या आहेत. त्यांना देखील युपीची जबाबदारी दिल्यामुळे राज्यात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.
आजतक या वाहिनीने २८ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान लोकसभेच्या २० मतदारसंघात लोकांचं मत जाणून घेतलं. ज्यामध्ये २४७८ लोकांनी आपलं मत नोंदवलं. काय आहे युपीतील लोकांच्या मनात?, कोणत्या पक्षावर त्यांचा आहे अधिक विश्वास?
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कामगिरी
पूर्णपणे संतुष्ट - १७
संतुष्ट - ४०
काहीही फरक नाही - २७
असंतुष्ट - १२
खूप असंतुष्ट - ०३
सांगू नाही शकत - ०१
पंतप्रधान मोदींची कामगिरी
पूर्णपणे संतुष्ट - २७
संतुष्ट - ४१
काहीही फरक नाही - १५
असंतुष्ट - ११
खूप असंतुष्ट - ०४
सांगू नाही शकत - ०३
सर्व पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवली तर
भाजप
२०१४ - ४२.३
२०१९ - ३५
अपना दल
२०१४ - ०१
२०१९ - ०१
काँग्रेस
२०१४ - ७.५
२०१९ - १२
रालोद
२०१४- ०१
२०१९ - ०१
सपा
२०१४ - २२.०२
२०१९ - २४
बसपा
२०१४ - १९.०६
२०१९ - २१
इतर
२०१४ - ६.४
२०१९ - ६
आघाडी झाली तर
भाजप+अपना दल
२०१४ - ४३.०३
२०१९ - ३६
काँग्रेस
२०१४ - ७.५
२०१९ - १२
सपा+बसपा+रालोद
२०१४ - ४२.८
२०१९ - ४६