राहुल गांधी यांच्या इफ्तार पार्टीला प्रणब मुखर्जी, नक्वी यांच्या पार्टीत रविशंकर-राजनाथ
राहुल गांधी यांच्या इफ्तार पार्टीला माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, सीपीएम महासचिव सीताराम येचुरी यांचीही उपस्थिती होती..
नवी दिल्ली : देशात सध्या राजकीय पक्षाच्या इफ्तार पार्टीची जोरदार चर्चा आहे. यात आता कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी दिलेल्या इफ्तार पार्टीची भर पडली आहे. तसेच भाजपचे नेते आणि राज्यमंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनीही इफ्तार पार्टी दिलीय या पार्टीत रविशंकर आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. मात्र, राहुल गांधी यांनी दिलेल्या पार्टीला माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची उपस्थिती होती. यामुळे या पार्टीची चर्चा जोरदार सुरु आहे.
राहुल गांधी यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहल्याने ही पार्टी जास्त चर्चेत आलेय. कारण प्रणव मुखर्जी हे महाराष्ट्रातील नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावरुन जोरदार टीका झाली. काँग्रेसनेही याला हरकत घेतली होती. त्यामुळे संघ आणि प्रणव मुखर्जी यांची जवळीक पाहून काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आजच्या इफ्तार पार्टीला प्रणवदा उपस्थित राहल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह विविध पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये ही इफ्तार पार्टी होत झाली. यानिमित्ताने विरोधकांची एकजूटही पाहायला मिळत आहे. राहुल यांनी विविध १८ पक्षांच्या नेत्यांना इफ्तारचे आमंत्रण दिले होते. यातील बहुतेक पक्षांच्या प्रतिनिधींनी पार्टीला हजेरी लावली आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस नेते पी. चिदंबरम, ए. के. अँटनी, आनंद शर्मा यांच्यासह शरद यादव, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, जदयु नेते दानिश अली, तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी, बसपा नेते सतीशचंद्र मिश्र, राष्ट्रवादीचे नेते डी. पी. त्रिपाठी, द्रमुक नेत्या कनिमोळी, राजद खासदार मनोज झा, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन इफ्तारला उपस्थित होते.
या इफ्तार पार्टीमध्ये भारतातील रशियन राजदूत निकोलेव कुदाशेव यांनी देखील भाग घेतला. चित्रपटात कुदाशेव कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटले. काही छायाचित्रांत राहुल गांधी, प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील आणि हमीद अन्सारी यांच्यासह काही छायाचित्रांमध्ये एकत्र बसले.