Optical Illusion : घुबडांमध्ये लपलीय मांजर, तुम्हाला दिसली का?
Optical Illusion : तुम्हाला फक्त 20 सेकंदांमध्ये ती लपलेली मांजर शोधून काढायचीय.
Optical Illusion : Optical Illusion मुळे बुद्धीला चालना मिळते. निरीक्षणक्षमता सुधारते. Optical Illusion मुळे आयक्यू लेव्हलही वाढते. मानसिक शक्ती वाढते. आम्ही तुमच्यासाठी आणखी चॅलेंज घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये अनेक घुबड आहेत. या घुबडांमध्ये एक मांजर लपून बसलीय. अट एकच आहे की तुम्हाला फक्त 20 सेकंदांमध्ये ती लपलेली मांजर शोधून काढायचीय. (optical illusion did you spot the cat hiding among the owls find out in few seconds)
तुम्ही 20 सेंकदात काय फक्त काहीच सेंकदांमध्ये शोधून दाखवतो, असं म्हणत आव्हान स्वीकारलं असेल, तर तुमचं स्वागत. मात्र तुम्हाला वाटतं तितकं मांजर शोधणं सोप्प नाहीये. अनेकांनी आपल्या तल्लख बुद्धीवर विश्वास ठेवत मांजर शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही ही मांजर काही सापडली नाही.
हा घुबडांचा फोटो नीट पहा. या फोटोत अनेक घुबड आहेत. मात्र त्यात मांजर लपलीय. चला तर पाहुयात तुमची नजर किती तल्लख आहे. अनेकांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काही मांजर सापडली नाही. चला अखेर आम्ही तुम्हाला आम्ही ती लपलेली मांजर दाखवतो.
फोटोच्या उजव्या कोपऱ्यात जरा नीट पहा. उजव्या कोपऱ्यापासून थोड खाली या. या उजव्या कोपऱ्यात वरुन खालच्या दिशेने तिसऱ्या क्रमांकावर ही मांजर लपून बसलीय.