मुंबई : सध्या प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त झाला आहे. पण व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मोबाईलमध्ये आपण अनेक गोष्टा पाहत असतो. पण याच दरम्यान जर एखादा Optical Illusion चा फोटो समोर आला तर आपण त्यात दडलेल्या गोष्टी शोधायला सुरुवात करतो. सोशल मीडियावर (Social Media) ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion)चे फोटो वेगाने व्हायरल होत असतात. या फोटोत अनेक गोष्टी दडलेल्या असतात. त्यांना शोधणं एक मोठं टास्क असते. त्यामुळे मेंदूला चालना देखील मिळते. त्यामुळे ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोतील दडलेल्या वस्तू किंवा प्राणी शोधण्यासाठी चढाओढ लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटोमध्ये एक झाड आहे आणि त्यामध्ये 5 पक्षी दडलेले आहेत. जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हाला काही क्षणांत 5 पक्षी दिसतील. फक्त तीक्ष्ण दृष्टी असलेलेच अचूक उत्तर देऊ शकतात. 


जर तुम्हाला फोटोमध्ये लपलेले कोणतेही पक्षी दिसत नसतील, तर आम्ही तुम्हाला काही टिप्स देतो. त्यात एक कोंबडा, एक कोंबडी आणि तीन पिल्ले लपलेली आहेत. चला तर मग ते पटकन शोधू.
.
.
.
.
.
.
झाडाच्या उजव्या बाजूला मध्यभागी एक कोंबडी आहे, तर अगदी मध्यभागी एक कोंबडा आहे आणि त्यांच्या पुढे एक पिल्लू आहे. तर दुसरा पिल्लू वरच्या उजव्या बाजूला आहे, तर तिसरा पिल्ला खालच्या डाव्या बाजूला आहे.