Optical Illusion : खोलीत आहेत दोन मांजरी; एक सोफ्यावर बसलेय तर दुसरी कुठे आहे ते शोधून दाखवा
फोटोमध्ये लपलेली दुसरी मांजर शोधणे हा टास्क आहे. एका नजरेत हा फोटो पाहिला तर मांजर दिसत नाही. मात्र, ज्यांची नजर तीक्ष्ण आहे त्यांनी 30 सेकंदात मांजर शोधून हे चॅलेंज पूर्ण केले आहे.
Optical Illusion Find The Cat Quiz: सोशल मीडियावर सध्या Optical Illusion असलेले अनेक फोटो व्हायरल होतात. Optical Illusion Quiz हा गेम अनेकजण आवडीने खेळत असतात. या फोटोंमध्येच प्रश्न आणि त्याचे उत्तर लपलेलं असत. अशा या Optical इमेज तुम्हाला डोकं चालवायला भाग पडतात. अशीच एक इमेज व्हायरल झाली आहे. फोटोमधील खोलीत दोन मांजरी आहेत. एक सोफ्यावर बसलेय तर दुसरी कुठे आहे ते शोधून दाखवण्याचे चॅलेंज या इमेजमध्ये आहे (find the cat).
फोटोमध्ये एक खोली दिसत आहे. या खोलीच्या मध्यभागी एक सोफा आहे. या सोफ्यावर एक मांजर बसलेली दिसत आहे. चॅलेंज आहे ते दुसरी मांजर शोधून दाखवण्याचे. फोटो मध्ये लपलेली दुसरी मांजर शोधण्यासाठी दहा सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे.
फोटोमध्ये लपलेली दुसरी मांजर शोधणे हा टास्क आहे. एका नजरेत हा फोटो पाहिला तर मांजर दिसत नाही. मात्र, ज्यांची नजर तीक्ष्ण आहे त्यांनी 30 सेकंदात मांजर शोधूुन हे चॅलेंज पूर्ण केले आहे.
कुठे लपले आहे दुसरे मांजर?
खोलीच्या मध्यभागी एक सोफा आहे. या सोफ्यावर एक ब्राऊन कलरचे मांजर झोपले आहे. या सोफ्यावरच मांजराच्या मागे एक उशी आहे. या उशीवर देखील मांजराचे चित्र आहे. मात्र, खरं मांजर नसून ते फक्त एक चित्र आहे. ज्या सोफ्यावर ब्राऊन रंगाचे मांजर बसलेय त्या सोफ्याच्या मागे एक खिडकी आहे. खिडकीजवळ एक टेबल आहे. टेबलावर बसचं चित्र असलेलं एक पेंटीग आहे. हे पेंटिंग एका झाडाच्या कुंडीच्या सपोर्टने उभं करण्यात आले आहे. खिडकी आणि सोफ्याजवळ एक लाकडाचा ओंडका दिसत आहे. हा लाकडाचा ओंडका मांजर असल्यासारखा भास होत आहे. मात्र, हे मांजर नाही.
सोफ्याच्या खालच्या बाजूला पाहिले तर पुन्हा एकदा मांजर दिसल्याचा भास होतो. सोफ्याला चिटकवून एक जाळीदार बास्केट ठेवले आहे. या बास्केटमध्ये एक ग्रे कलरचे ब्लँकेट गुंडाळून ठेवण्यात आले आहे. या ब्लँकेटला पाहून ते मांजर असल्याचे वाटते. मात्र, ते देखील मांजर नाही. दुसरं मांजर हे सोफ्याखाली लपलेले आहे. काळ्या रंगाचे मांजर हे सोफ्याखाली दडून बसले आहे. या मांजराचा एक डोळा चमकताना दिसतो आहे. एक नजरेत हे काळं मांजर दिसत नाही. त्यामुळे अनेक जण हे दुसरं मांजर शोधण्याचे चॅलेंज 30 पूर्ण करु शकले नाहीत.