Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेदार फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. यापैकी काही ऑप्टिकल इल्झून्स असतात. आपलं व्यक्तिमत्त्व घडतं ते आपल्या बुद्धीनं आणि मनानं. आपल्या मनाचे आणि बुद्धीचे खेळंही तितकेच मजेशीर असतात. सोशल मीडियावर अनेक मजेदार पझल्स शेअर केले जातात. यापैकी ऑप्टिकल इल्यूजन्स खूप व्हायरल आहेत. काही ऑप्टिकल इल्यूजन्स सोडवण्यासाठी (Personality Test) अनेक शर्तीचे प्रयत्न करतात. पण या प्रयत्नात काही लोकच यशस्वी होतात तर काही होऊ शकत नाहीत. परंतु तुम्हाला माहितीये का जरासं स्मार्ट वर्क केलं कर तुम्हीही अशी अवघड टाकणारी कोडी लवकरात लवकर सोडवू शकता. काही ऑप्टिकल इल्यूजन्स तुमच्या मेंदूची चाचणी घेतात आणि काही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात. (optical illusion try to find out old designed telephone from the picture iq test personality)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता समोर आलेल्या एका फोटोतून तुम्हाला हरवलेला जुना टेलिफोन शोधायचा आहे. या फोटोतून तुम्हाला एक घर दिसेल ज्या घरात एक अंगण आहे आणि त्यात एक लहानसं कुटूंबही आहे. त्यांच्या आजूबाजूला लहान मुलं आहेत आणि ती अवतीभोवती खेळतही आहेत. त्याच्या बाजूला खेळण्यांचा पसारा झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. यातच तुम्हाला एक जुना फोन शोधायचा आहे. 


या फोटोची गंमत म्हणजे हा फोन लगेच दिसत नाही. पडलेल्या वस्तूंभोवती घरातील अनेक सदस्य बसलेले असून दोन मुले खेळत असल्याचे चित्र दिसत आहे. पण अचानक तो टेलिफोन सगळ्या खेळण्यांमध्ये आहे असं दिसत नाही. जरा डोकं लावा आणि हा फोन शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला जुना फोन कसा दिसतो त्याची रचना पटकन आठवत नसेल तर गुगल वर सर्च करून पाहा आणि नंतर तो फोन या फोटोत शोधायचा प्रयत्न करा. जर तुम्ही तो शोधलात तर तुमच्यासारखा हूशार व्यक्ती दुसरा कोणीच नसेल. 


वास्तविक या चित्रात हा टेलिफोन वरच्या बाजूला ठेवण्यात आला आहे. सत्य हे आहे की टेलिफोन खूपच लहान दिसतो आणि बाकीची खेळणी त्यापेक्षा मोठी आहेत. आणि हीच या फोटोतली गंमत आहे. लाल टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या उजव्या हातात कार आहे आणि हा टेलिफोन त्याच कारच्या पुढच्या बाजूला ठेवला आहे.