चालत्या ट्रेनमध्ये पिझ्झा खायचा मूड झाला? अशा वेळेस तुम्ही काय कराल? ट्रेनमधून उतरल्यानंतर हॉटेलवर किंवा जिथे कुठे पोहोचायचं असेल तिथे जाऊन पिझ्झा ऑर्डर कराल, बरोबर? पण तुम्हाला आता थांबायची काहीही गरज नाही. तुम्ही थेट ट्रेनमधून (order food from train) तुम्हाला हवं ते जेवण ऑर्डर करू शकतात. अगदी तुम्ही घरी ज्या पद्धतीने जेवण पटकन ऑनलाईन फूड ऑर्डर करतात अगदी त्याच पद्धतीने. तेही तुम्हाला हव्या त्या ठिकाणाहून. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही थेट WhatsApp वरून जेवण ऑर्डर करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात हे कसं शक्य आहे. (How to order food from running train by using whatsapp)


खालील पायऱ्या नीट वाचा: 


  • सर्वात आधी 7042062070 हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा 

  • यानंतर तुम्हाला या नंबरवर <hi> पाठवावा लागेल 

  • यानंतर तुम्हाला लगेच रिप्लाय देखील येईल

  • रिप्लायमध्ये तुम्हाला विविध ऑप्शन्स पाहायला मिळतील 

  • या वेगवेगळ्या ऑप्शन्समधून तुम्हाला ऑर्डर फूड (Order Food) हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल 

  • यानंतर तुम्हाला तुमचा PNR नंबर किंवा ट्रेनचा नंबर टाकावा लागेल 

  • यानंतर तुमच्या व्हाट्सअँपवर एक लिंक येईल 

  • या लिंकवर क्लिक करून वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्ही येणाऱ्या स्टेशनच्या हिशोबाने तुम्हाला हवं ते जेवण ट्रेनमधूनच मागवू शकतात 


कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये तुम्हाला तुमचा अचूक PNR आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल. कारण तुमच्या मोबाईलवर आलेला OTP तुम्हाला वापरावा लागणार आहे. 


पैसे कसे भराल?


यातील पेमेन्टचे ऑप्शनही तुम्हाला वेबसाइटवरून सिलेक्ट करता येईल 


या वेबसाईटवर तुम्हाला काही कुपन कोड देखील पाहायला मिळतील. ज्यांचा वापर करून तुम्ही तुम्ही ऑर्डर केलेल्या जेवणावर डिस्काऊंट मिळवू शकतात. वेबसाईटवर तुम्हाला बिर्याणी, थाळी, नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन अशा विविध प्रकारचे मेन्यू पाहायला मिळतील. तुम्ही जैन पद्धतीचं जेवणही ऑर्डर करू शकतात. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा.


order food on the train using whatsapp know step by step process