२०२२ पर्यंत कृषी निधी दुपटीने वाढवणार: पंतप्रधान मोदी
पंतप्रधानांनी आज देशभरात सहाशे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला
नवी दिल्ली: २०२२ पर्यंत कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी निधीमध्ये दुप्पट वाढ करुन तो २ लाख १२ हजार कोटी केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. पंतप्रधानांनी आज देशभरात सहाशे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. उत्पादन खर्च कमी करणं, शेतमालाला योग्य हमीभाव, अन्नधान्य सडण्यापासून वाचवणं, आणि उत्पन्नासाठी इतर कृषि पर्यायांचा विचार करणं या चतुसूत्रीवर सरकार काम करत असल्याचं मोदींनी म्हटलंय. जो शेतकरी मेहनत करतो, त्याचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मोदी म्हणाले.