नवी दिल्ली :  मंगळ ग्रहावर जाण्यासाठी तब्बल 1 लाख 38 हजार 899 भारतीयांनी तयारी केलीय आहे. या सर्वांनी इनसाईट मिशनच्या माध्यमातून आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे.


नासातर्फे ऑनलाईन बोर्डिंग पास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 मे 2018 रोजी नासाचं हे इनसाईट मिशन सुरु होणार आहेत. या अंतर्गत ज्या नागरिकांनी मंगळ ग्रहावर जाण्यासाठी बुकिंग केलं आहे. अशा मंडळींना नासातर्फे ऑनलाईन बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. मंगळावर जाण्यासाठी रजिस्ट्रेशन झालेल्या नागरिकांचं नाव सिलिकॉन चिपवर इलेक्ट्रॉनिक्स बीमच्या मदतीने कोरण्यात येणार आहे. चिपवर कोरण्यात आलेली अक्षरं ही केसाच्या एक हजाराव्या भागाहूनही अधिक पातळ असणार आहेत.


भारत तिसऱ्या क्रमांकावर


नासाच्या मते, मंगळ ग्रहावर जाण्यासाठी जगभरातील २४ लाख २९ हजार ८०७ नागरिकांनी अर्ज केले होते. तिकीट बुक करणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेतून ६ लाख ७६ हजार ७७३ नागरिकांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे. तर, चीनमधून २ लाख ६२ हजार ७५२ नागरिकांनी आपलं बुकिंग केलं आहे.