लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्याची घटना समोर आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केलं. शेतकऱ्यांचं एक लाख रुपयांपर्यंतचं कर्जमाफ करण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली होती... आणि ती घोषणा 'उदार' सरकारनं खरीही करून दाखवली. मात्र, या कर्जमाफीचं कटू वास्तव समोर आलंय.


शेतकऱ्यांची क्रूर थट्टा


उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये कर्जमाफीच्या नावाखाली सरकारनं शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्याचं समोर आलंय. इथल्या एका शेतकऱ्याचं १९ पैसे तर एका शेतकऱ्याचं ५० पैसे कर्जमाफ करण्यात आलंय. काही शेतकऱ्यांचं एक रुपया तर काहींचं दीड रुपयांचं कर्जमाफ करण्यात आलंय. 


याबाबतचं सरकारी पत्रही या शेतकऱ्यांना सोपवण्यात आलंय. यांत दोनशे असे शेतकरी आहेत ज्यांचं हजार रुपयांचं कर्जही माफ झालेलं नाही. तर ५० असे शेतकरी आहेत ज्यांचं १०० रुपयांहून कमी कर्ज माफ करण्यात आलंय. 


उत्तर प्रदेश सरकारनं मोठा गाजावाजा करत कर्जमाफी योजना जाहीर केली. यासाठी शेतकऱ्यांची सत्यता पडताळणी, आधार कार्डसह विविध कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली. मात्र इतकं सगळे केल्यानंतर १९  पैसे आणि ५० पैसे कर्ज माफ झाल्यानं शेतक-यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.


सरकारचा दावा


दरम्यान, शेतकऱ्यांचे हे आरोप फेटाळून लावत, आम्ही एक लाख टक्का कर्ज माफ केलंय... जेवढं कर्ज असेल तेवढं माफ झालंय असं अगदी उलट प्रतिक्रिया उत्तर प्रदेश सरकारनं दिलंय.