लंडन : ऑक्सफॉर्डच्या वैज्ञानिकांनी आता कोरोना वायरसचे परीक्षण करणारी रॅपिड एंटीजन किट बनवली आहे. यामुळे अवघ्या ५ मिनिटांत कोरोना टेस्ट पूर्ण होणार आहे. रिसर्चरने गुरुवारी यासंदर्भात डिटेल्स दिले आहेत. व्यवसाय आणि हवाई अड्ड्यांवर याद्वारे सामुहीक परीक्षण केले जाऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतर वायरस आणि कोरोना वायरसमध्ये फरक कळणे यामुळे सोपे जाणार आहे. यामुळे वायरसच्या कणांबद्दल माहीती मिळेल. ही खूपच सरळ, खूप जलद आणि कमी खर्चाची पद्धत असल्याचे ऑक्सफॉर्डच्या भौतिक विभागाचे प्रोफेसर अचिल्स कापेनीडीस यांनी सांगितली. 


रॅपिड टेस्टिंग किटचे उत्पादन २०२१ च्या सुरुवातीपासून सुरु होईल. तसेच ६ महिन्यांच्या आत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल असेही सांगण्यात येतंय.



गेल्या काही महिन्यात कोरोना वायरसच्या परीक्षण करणाऱ्या रॅपिड एंटीजन टेस्ट खूप उपयोगी आणि लोकप्रिय होत आहेत. पण हे डिवाइस वापरात आणल्यावर टेस्ट होणं अधिक सोपं होईल असं सांगण्यात येतय. याची किंमत सध्याच्या डिवाइसच्या तुलनेत कमी असणार असल्याचेही सांगितलंय. 


हिवाळ्याच्या दिवसात ही टेस्ट यशस्वी होईल. कारण तेव्हा कोरोना वायरस पुन्हा एकदा पीक पॉईंटवर असेल असेही सांगण्यात आले.