मुंबई : आरोग्य क्षेत्रात काम करणारी प्रमुख कंपनी ऑक्सी (oxxy) यांनी नवजात मुलींसाठी नवी सुविधा सुरु केली आहे. देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी ११ हजार रुपयांचा एफडी ही कंपनी करणार आहे. देशातील लिंगभेद कमी करणे हा यामागील उद्देश आहे. त्याचबरोबर नवी जन्माला येणाऱ्या मुलीचे शिक्षण आणि करिअर उत्तम होण्यासाठी ही पैशांची मदत केली जाणार आहे. ऑक्सीने सांगितले की, ऑक्सी कन्या शिशु विकास कार्यक्रमा अंतर्गत देशभरात मुलीला जन्म देणाऱ्या आई-वडीलांना ११ हजार रुपयांचा एफडी देण्यात येईल.


मुलींच्या भविष्यासाठी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई-वडीलांचा धर्म, सामाजिक स्थिती किंवा भौगोलिक स्थिती इत्यादीचा विचार करुन पैसे देण्यात येतील. मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे, असे ऑक्सीने सांगितले. मुली १८ वर्षांच्या झाल्यावर या रक्कमेचा त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार हवा तसा वापर करु शकतात. हे पैसे संपूर्णपणे मुलीसाठी असून भविष्यात त्यावर कोणाचाही अधिकार राहणार नाही. 


काय आहे ऑक्सी केअर?


ऑक्सी केअर आरोग्य क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. ऑक्सी हेल्थकेअर १५०० शहारात २ लाखांहुन अधिक सेंटरमध्ये उपलब्ध आहे. कंपनी १.५ लाख हेल्थकेअर नेटवर्क पार्टनरच्या माध्यमातून फंड एकत्रित करत आहे. 


असे करु शकाल आवेदन


ऑक्सी हेल्थ केअरच्या या योजनेत तीन महिन्यांची गर्भवती महिला आवेदन करु शकते. डिलीव्हरी झाल्यानंतर जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या नावे ११ हजार रुपयांची एफडी करण्यात येईल. १८ वर्ष पूर्ण झाल्यावर ती मुलगी कोणत्याही अडीअडचणीशिवाय याचा उपयोग करु शकते. आवेदन तुम्ही ऑक्सी हेल्थ अॅपवरही करु शकता.