Oxygen Concentrators Import: कोरोनाने भारतात महासंकटाचे रुप घेतले आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने वयक्तिक / खासगी वापरासाठी ई कॉमर्स पोर्टलवरून ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर आयात करण्याची परवानगी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडच्या वतीने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर आयात करण्यासाठी 31 जुलै पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. कस्टम क्लिअरंसच्या रेकॉर्डमध्ये हे गिफ्ट मानले जाणार आहे.


जारी केलेल्या सूचनेनुसार, पोस्ट आणि कुरियरच्या माध्यमांतून आयात करण्याऱ्यांमध्ये ई कॉमर्स पोर्टल देखील सहभागी आहेत. देशात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.



ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर म्हणजे काय?


ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर एक मेडिकल उपकरण आहे. उपकरणाच्या माध्यमातून बाहेरील हवेतून ऑक्सिजन फिल्टर करून रुग्णांना दिला जातो. ऑक्सिजन सिलेंडरमधील ऑक्सिजन संपल्यास तो पुन्हा भरावा लागतो. परंतु कॉन्सेट्रेटरच्या माध्यमातून सलग ऑक्सिजन पुरवता येतो.