OYO Room Founder Ritesh Agarwal Father Dies : देशभरात अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यांचे वडील रमेश अग्रवाल (Ramesh Agarwal) यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार गुरुग्राममधल्या (Gurugram) एका टोलेजंग इमारतीवरुन कोसळून त्यांचा मृत्यू झाला. ओयोच्या प्रवक्तांनी रितेश अग्रवाल यांच्या वडीलांचा मृत्यू झाल्याच्या बातमीची पृष्टी केली आहे.  रिेतेश अग्रवाल यांचं 7 मार्चलाच लग्न झालं होतं. लग्नाच्या तीन दिवसानंतरच त्यांच्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेवेळी मुलगा रितेश अग्रवाल, सून आणि रमेश अग्रवाल यांची पत्नी घरातच होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश अग्रवाल यांची इमारतीच्या 20 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. गुरुग्राममधल्या DLF क्रिस्टा सोसायटीत अग्रवाल कुटुंब राहात होतं. रमेश अग्रवाल हे दुपारी एकच्या सुमारास घराच्या बालकीन होते. यावेळी बालकीतून पडून त्यांचा मृत्यू झाला. रमेश अग्रवाल बाल्कनीतून खाली कसे पडले याचा तपास पोलीस करत आहेत. 


रितेश अग्रवाल यांची प्रतिक्रिया
वडीलांच्या मृत्यूसंदर्भात रितेश अग्रवाल यांनी निवेदन जारी केलं आहे. माझे मार्गदर्शक, आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहाणारे माझे वडील रमेश अग्रवाल यांचं 10 मार्चला निधन झालं. त्यांचं अस्तित्व हे आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी होतं. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे शब्द नेहमीच आमच्या ह्रदयात राहतील. 


याच आठवड्यात रितेश यांचं झालं होतं लग्न
रितेश अग्रवाल यांचं याच आठवड्यात गीतांशा सूद हिच्याशी लग्न झालं. 7 मार्चला रितेश आणि गीतांशाचा शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात देशातील आणि जगभरातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. पेटीएमचे सीईओ विजय शेखर, सॉफ्टबँकचे प्रमुख मासोयोशी सोन हे देखील विवाह सोहळ्याला उपस्थित होते. रितेश अग्रवाल यांची देशातील अब्जाधिशांमध्ये गणना होते. अगदी कमी वयात त्यांनी यशाचं शिखर गाठलं आहे. रितेश यांनी 2013 मध्ये ओयो रुम्सची सुरुवात केली होती.


वेगाने पसरणारी हॉटेल चेन
ओयो रुम्स (On Your Own room) ही संकल्पना रितेश अग्रवाल यांनी पहिल्यांदा देशात आणली. यानंतर जगभरात ओयो हॉटेल चेनचा वेगाने प्रसार झाला. आज जगभरातील 35 हून अधिक देशांमध्ये 1.5 हॉटेलबरोबर ओयो संलग्न आहे. परवडेल अशा किमतीत रुम्स बुक करण्याची सुविधा ओयोने दिल्याने ग्राहकांचाही याला प्रचंड प्रतिसाद लाभतोय.