नवी दिल्ली : 'आयएनएक्स मीडिया' गैरव्यवहार प्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेल्या पी चिदम्बरम यांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. चिदम्बरम यांची अटक रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. अटक थांबवावी अशी याचिका चिदम्बरम यांनी केली होती. त्यावर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्या. एन. व्ही. रमणा यांच्या न्यायालयासमोर आज ही याचिका सुनावणीसाठी आली होती. मात्र, न्या. रमणा यांनी या प्रकरणावर निर्णय देण्यास नकार देत आधी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर याबाबत दाद मागावी, असा सल्ला चिदम्बरम यांच्या वकिलांना दिला. मात्र, चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी तोपर्यंत दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती तरी द्यावी, अशी विनंती कोर्टाला केली. मात्र, न्या. रामणा यांनी यालाही नकार दिला. 


परंतु, मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई सध्या अयोध्या प्रकरणाची सुनावणी करत असल्याने चिदम्बरम यांना दिलासा मिळण्याची शक्यता धूसरच आहे. चिदम्बरम यांच्याविरोधात सीबीआयने लूकआऊट नोटीस काढलीय. 


चिदम्बरम यांच्याविरोधात 'लूक आऊट' नोटीस


मात्र, चिदंबरम यांना दिलासा मिळण्याची शक्यता धूसर आहे. कारण देशाबाहेर पळून जाण्याची भीती असल्याने सीबीआयने 'लूक आऊट' नोटीस काढलीय. 


दरम्यान, चिदंबरम यांना अटक करण्यासाठी कालपासून चार ते पाच वेळा सीबीआय आणि ईडीचं पथक चिदम्बरम यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पोहचलं. मात्र, चिदम्बरम घरी नसल्यामुळे तपास यंत्रणांना माघारी फिरावं लागलं. 



अखेर चिदम्बरम यांच्या घराबाहेर सीबीआयकडून नोटीस लावण्यात आली असून दोन तासात सीबीआयसमोर हजर राहण्याचं सांगण्यात आलं. दरम्यान पी चिदम्बरम हे अजूनही सीबीआयसमोर हजर झालेले नाही.


दरम्यान, प्रियांका गांधी वाड्रा यांनी पी. चिदंबरम यांच्या बचावासाठी मैदानात उडी घेतलीय. सत्तेला सत्य ऐकून चालत नाही असं प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.