नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया कंपनीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांचा मुक्काम अजून तरी जेलमध्येच असणार आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत त्यांची कोठडी वाढवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी टाळण्यासाठी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी बरेच प्रयत्न केले. न्यायालयीन कोठडीऐवजी चिदंबरम यांना ईडीच्या ताब्यात दिले जावे, असा सिब्बल यांचा प्रयत्न होता. मात्र, न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पी.चिदंबरम यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.


न्यायालयाच्या या निर्णयानंतर चिदंबरम यांना तात्काल न्यायाधीशांकडे तिहार तुरुंगात आपल्याला वेस्टर्न टॉयलेट आणि अन्य सुविधा मिळाव्यात, अशी विनंती केली. न्यायालयाने त्यांची ही विनंती मान्य केली. तसेच चिदंबरम यांना त्यांची औषधेही पुरवण्यात येणार आहेत.