कृष्णा घाटीतील बटालियन हेडक्वार्टर होतं पाकच्या निशाण्यावर
पाकिस्तानी वायुसेनेने 4 सैन्य ठिकाणांवर निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा घाटीतील बटालियन हेडक्वार्टर हे पाकिस्तानच्या निशाण्यावर होते. पाकिस्तानने नियारी सप्लाय आणि सैन्याच्या ठिकाणांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी वायुसेनेने 4 सैन्य ठिकाणांवर निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानी एअर स्पेसमध्ये घुसलेल्या दोन लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला. या कारवाईत भारतीय पायलटला ताब्यात घेण्यात आले आहे. एक विमान हे पाकिस्तानी व्याप्त काश्मीर तर दुसरे विमान हे जम्मू काश्मीर मध्ये क्रॅश करण्यात आल्याचे पाकिस्तानचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी आपल्या ट्वीटरवरून सांगितले. दरम्यान पाकिस्तान वायु सेनेने हे वृत्त फेटाळून लावले आणि आमचे कोणतेही विमान बेपत्ता झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
नियंत्रण रेषे शेजारी असलेल्या राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना भारतीय वायुसेनेने पळवून लावले. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी जेट्स घुसता क्षणी इंडियन एअरफोर्सने कारवाई करत त्यांना पळायला भाग पाडलं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान जेट्सने परत असताना बॉम्ब वर्षाव केला होता.
व्हिडीओ व्हायरल
मिग विमानांनी पाकिस्तानचे एक विमान पाडल्याचा दावा भारताच्या परराष्ट्र मत्रांलयाने केला आहे. भारताने एक विमान गमावल्याची माहितीही यामध्ये देण्यात आली. दरम्यान भारताचा एक वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचे पाकिस्तानतर्फे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानला प्रत्युत्तरासाठी भारताचे 6 विमानांचे उड्डाण, 5 विमाने परतल्याचे सांगण्यात येत आहे. विंग कमांडर अभिनंदन आपल्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानतर्फे करण्यात येत आहे. दरम्यान 'रेडिओ पाकिस्तान'ने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओतील व्यक्ती भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान असल्याचं सांगण्यात येतंय. या व्यक्तीला त्याची ओळख विचारल्यानंतर आपला सर्व्हिस क्रमांक २७९८१ असल्याचं त्यानं सांगितलेलं या व्हिडिओत दिसतंय. आपण भारतीय वैमानिक असून आपला धर्म हिंदू असल्याचंही त्यानं म्हटले आहे.