Pakistan Deny Airspace Indian Plane NDRF Team Medical Aid To Earthquake Hit Turkey: पाकिस्तानने (Pakistan) आज (7 फेब्रुवारी 2023) सकाळी भूकंपग्रस्त तुर्कीला मदत (Medical Aid To Earthquake Hit Turkey) घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या (Indian Airforce) विमानांना आपल्या हवाई क्षेत्रातून जाण्याची परवानगी नाकारली. आप्तकालीन स्थितीमध्ये अशाप्रकारे भारताने पाठवलेल्या मदतीच्या वाटेत आडकाठी आणण्याचं काम पाकिस्तानने दुसऱ्यांदा केलं आहे. सीएननने दिलेल्या माहितीनुसार तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर मृतांची संख्या 5 हजारांच्या वर गेली आहे. भूकंपाचं केंद्र तुर्कीच्या अग्नेय दिशेला असलेल्या कहरामनमारसमध्ये होतं. या भूकंपाचे झटके काहिरा शहरापर्यंत जाणवले.


भारताने पाठवली मोठी मदत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरामधून तुर्कीमध्ये मदत पाठवली जात आहे. अनेक देशांनी आपल्या आप्तकालीन टीम तुर्कीमध्ये मदतीसाठी पाठवल्या आहेत. तुर्कीमधील 24 हजार कर्मचारी बचावकार्य करत असल्याचं येथील प्रशासाने सांगितलं आहे. तुर्कीला शक्य ती मदत करण्यासाचे निर्देश भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. भारताने आपली एक एनडीआरएफची तुकडी तुर्कीला पाठवली आहे. यामध्ये ढीगाऱ्या खाली अडकलेल्या लोकांना मदत करणारी टीम, मेडिकल टीम तसेच अन्य तज्ज्ञांचा समावेश आहे.



मदत कार्याबरोबरच रसदही पाठवण्यात आली आहे. भारतीय वायू सेनेच्या पहिल्या विमानाने सोमवारी रात्री तुर्कीच्या दिशेने उड्डाण घेतलं. हे विमान मंगळवारी सकाळी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास तुर्कीमधील अडाणा विमानतळावर पोहोचलं. भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करम्यासाठी पाठवलेल्या टीममध्ये महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांबरोबरच कुत्रांचं पथक, चिकित्सका करणारी मेडिकल टीम, ड्रिलिंग टीम आणि इतर मदत साहित्य आहे.


नक्की वाचा >> Turkey Earthquake News: 12 तासांत भूकंपाचे 46 धक्के! 1939 च्या भूकंपात 33000 जण दगावले; जाणून घ्या कारण


मागच्या वेळेसही पाकिस्तानने केलेली अडवणूक


मागील वेळेसही पाकिस्तानने भारताला अशाप्रकारे हवाई क्षेत्राचा वापर करण्यापासून रोखलं होतं जेव्हा 2021 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला होता. अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेल्या परिस्थितीमध्ये 2021 मध्येच डिसेंबर महिन्यात युद्धग्रस्त अफगाणिस्तानला इतर मदत पाठवण्यासाठी 50,000 मेट्रिक टन गहू पाठवला होता. तसेच औषधेही भारताने अफगाणिस्तानला पाठवली होती. मात्र यात पाकिस्तानने आडकाठी आणलेली.


पंतप्रधान कार्यालयाची बैठक


भूकंप झाल्याची बातमी समोर आल्यानंतर दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयाच्या नेृत्वाखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये तुर्कीला मदत करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. तुर्की सरकारबरोबर समन्वय साधून एनडीआरएफ आणि वैद्यकीय तुकड्या भारतातून तुर्कीला पाठवण्यात आल्या आहेत. या आप्तकालीन परिस्थितीमध्ये हवी ती मदत करण्यासाठी भारत तयार असल्याचं भूकंपग्रस्त देशांना कळवण्यात आलं आहे.



तुर्कीला कळला खरा मित्र कोण?


एकीकडे भारताने तुर्कीला मदतीचा हात पुढे केला असतानाच पाकिस्तान स्वत: आर्थिक संकटात असल्याने त्यांच्याकडून फारशी मदत अपेक्षित नाही. त्यातच भारत करत असलेल्या मदतीमध्येही पाकिस्तान आडकाठी आणत आहे. यापूर्वी तुर्कीने अनेकदा आंतरराष्ट्रीय मंचांवरुन काश्मीर प्रश्नी भारतविरोधी भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं आहे. आता भारताने मागील सारं काही विसरुन तुर्कीला या संकाटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला असल्याने अनेकांनी सोशल मीडियावर तुर्कीला त्यांच्या जुन्या भूमिकांची आठवण करुन दिली आहे.