नवी दिल्ली : पाकिस्तानने गेल्या पाच वर्षात २९८ स्थलांतरित भारतीयाना नागरिकत्व दिल्याची माहिती समोर आलीये. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने संसदेमध्ये ही माहिती दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१२ ते १४ एप्रिल २०१७ या दरम्यानच्या काळात तब्बल २९८ स्थलांतरित भारतीयांना पाकिस्तानने नागरिकत्व दिल्याची माहिती संसदेत देण्यात आली. सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ पक्षाचे शेख रोहाली असगर यांनी याबाबत सवाल उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना ही माहिती समोर आलीये.


२०१२मध्ये ४८ निर्वासित भारतीयांना पाकिस्तानचे नागरिकत्व देण्यात आले. त्यानंतर २०१३मध्ये ही संख्या ७५ पर्यंत वाढली. २०१४मध्ये ७६, २०१५मध्ये १५ जणांना पाकिस्तानी नागरिकत्व देण्यात आले. तर २०१६मध्ये ६९ आणि यावर्षी १४ एप्रिलपर्यंत १५ स्थलांतरित भारतीयांना पाकिस्तानने नागरिकत्व दिलेय.