नवी दिल्ली : पाकिस्तान सैन्याकडून आज पुन्हा भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. भारतीय वायुसेनेच्या सतर्कतेमुळे हा पाकिस्तानचा हा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सैन्याने पुंछमध्ये हवाई हद्दींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताचे लष्कर-वायुदलाचे अधिकारी यासंदर्भात अधिक माहिती देणार आहेत.   पाकिस्तान नियंत्रण रेषेवर (एलओसी) सलग शस्त्रसंधीचं उल्लंघनही सुरूच आहे. बुधवारी आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानी सेनेकडून जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. रात्रभर या ठिकाणी गोळीबार सुरू होता. भारतीय लष्करानंही सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केलीय. शहरी भागाला पाकिस्तानकडून लक्ष्य केलं जातंय. प्रचंड गोळीबार सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. गुरुवारी सकाळी जवळपास ७ वाजता हा गोळीबार बंद झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील जैश ए मोहम्मदच्या तळावर कारवाई केली होती. याचे उत्तर देण्यासाठी पाकिस्ताननेही आपली विमान भारतीय हद्दीत घुसवली. पण नियंत्रण रेषे शेजारी असलेल्या राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना भारतीय वायुसेनेने पळवून लावले. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी जेट्स घुसता क्षणी इंडियन एअरफोर्सने कारवाई करत त्यांना पळायला भाग पाडले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान जेट्सने परत असताना बॉम्ब वर्षाव केला होता.