नवी दिल्ली : गुप्तहेरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीसोबत भेट झाली होती. यावेळी त्यांच्या आई आणि पत्नीला वाईट वागणूक दिली गेल्याचे परराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराज यांनी समोर आणले होते. आता या वादाला नवे वळण फुटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने एक अजब दावा केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनीच वाईट वागणूक दिल्याचे कुलभूषण यांनी सागितल्याचे पाकतर्फे सांगण्यात आले आहे. 


'ना पाक' इरादे


आपण एकदम ठणठणीत असून पाककडून चांगली वागणूक मिळाल्याचा कुलभूषण यांनी व्हिडिओत सांगितल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने हा व्हिडिओ जारी केल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणामूळे पाकिस्तानचे 'ना पाक' इरादे पुन्हा समोर आले आहेत.