नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमा भागात घुसून कारवाई केली आहे. भारताने पाकिस्तान अधिकृत कश्मीरमध्ये जोरदार कारवाई केली आहे. वायुदलाने जवळपास 12 मिराज 2000 विमानांनी पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे ठिकाणं उद्धवस्त केले आहेत. भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईचे फोटो पाकिस्तानातूनच जारी करण्यात आले आहेत. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये भारतीय वायुदलाच्या हल्ल्य़ाचे शेल दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने जवळपास 1 हजार किलो बॉम्ब टाकले. या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक कॅम्प उद्धवस्त झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय वायुदलाने मंगळवारी पहाटे 3.30 वाजता ही कारवाई केली आहे. भारतीय हवाईदलाच्या जवळपास 12 विमानांनी ही कारवाई केली. पठानकोट एअरबेस आणि मध्य भारतातून हवाईदलाच्या विमानांनी उड्डान केलं. मिराज 2000 या विमानांनी पाकिस्तानी रडारला जाम करत ही कारवाई केली.



मुजफ्फराबाद, चकोटी, बालाकोटमध्ये भारतीय दलाने दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करत जैशने अनेक तळ उद्धवस्त केले आहेत. भारतीय हवाईदलाच्या लढाऊ विमानांच्या कारवाईनंतर पाकिस्तानने राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर रात्रभर फायरिंग केली. अनेक ठिकाणी मोर्टार टाकले.