जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून सतत नापाक हरकती सुरु आहेत. सीमेवर पाकिस्तानकडून सतत सीजफायर उल्लघंन होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने पुंछच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये गोळीबार केला. गोळीबारात एक भारतीय जवान गंभीरपणे जखमी झाला. आर्मीच्या उघमपूर रुग्णालयात जवानाला दाखल करण्यात आलं आहे. 


या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या सेनेने एलओसीजवळ कृष्णाघाटी सेक्टरमध्ये संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांनी गोळीबार केला. भारतीय जवान देखील याला जोरदार उत्तर देत आहे.


एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केजी सेक्टरमध्ये एलओसी जवळ बलनोईमध्ये काही मोर्टार गोळे पडले. ज्यामुळे 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यावर्षी आतापर्यंत पाकिस्तानच्या गोळीबारात आतापर्यंत १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ हून अधिक लोकं जखमी झाले आहेत.