पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीयाला अटक, फेसबुकद्वारे ISI मध्ये भरती
सुरक्षा यंत्रणेच्या इन्टेलिजन्स युनिटसोबत यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या एका ऑपरेशनमध्ये आयएसआयच्या इशाऱ्यांवर दहशतवादी कारवाई करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आलीय. `पंजाब इंटेलिजन्स युनिट`नं ही कारवाई केलीय. यामध्ये पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील धलेके गावचा रहिवासी असणाऱ्या आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवि कुमार याला अटक करण्यात आलीय.
नवी दिल्ली : सुरक्षा यंत्रणेच्या इन्टेलिजन्स युनिटसोबत यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या एका ऑपरेशनमध्ये आयएसआयच्या इशाऱ्यांवर दहशतवादी कारवाई करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आलीय. 'पंजाब इंटेलिजन्स युनिट'नं ही कारवाई केलीय. यामध्ये पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील धलेके गावचा रहिवासी असणाऱ्या आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवि कुमार याला अटक करण्यात आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी कुमारकडे सेनेच्या अतिमहत्त्वाच्या संस्थांची व सेनेच्या वाहनांचे काही फोटो, संरक्षित क्षेत्रांची हातानं बनवलेले काही नकाशे, सेनेचं ट्रेनिंग मॅन्युअल्सची फोटोकॉपी अशा काही गोष्टी सापडल्या आहेत.
त्याच्यावर ऑफीशियल सीक्रेट एक्टच्या कलम ३, ४, ५ आणि ९ अंतर्गत आणि आयपीसीच्या कलम १२०-बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
प्राथमिक माहितीनुसार, आयएसआयच्या एका अधिकाऱ्यानं फेसबुकच्या माध्यमातून रविला सात महिन्यांपूर्वी हेरगिरीसाठी भरती केलं होतं. तो सेनेची विविध माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देण्याचं काम करत होता. २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान तो आयएसआयच्या खर्चावर दुबईच्या दौऱ्यावरदेखील गेला होता. त्यानंतर मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून तो सतत पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता.