इस्लामाबाद : आयसीसी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर जगभरातील भारतीय जल्लोष करत आहेत. टीम इंडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीट करत टीम इंडीयाचे अभिनंदन केले. पण हा आनंद पाकिस्तानी सेनेला काही रुचला नाही. पाकिस्तानी सेनेच्या मीडिया विंग इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन (आईएसपीआर) चे महानिदेशक आसिफ गफूर यांनी अमित शाहंच्या ट्विटनंतर त्याला तात्काळ उत्तर दिले आहे. क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानला दिलेली मात आणि दोन्ही देशांत झालेल्या युद्धजन्य परिस्थितीची तुलना करु नका असे आवाहन गफूर यांनी केले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडीयाने पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक केले आणि परिणाम सारखाच निघाला अशा आशयाचे ट्वीट गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. तसेच शानदार खेळासाठी टीम इंडीयाचे कौतूकही त्यांनी केले. प्रत्येक भारतीय हा आनंद अनुभवत असल्याचे अमित शाह आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले. या ट्वीटला गफूर यांनी आपल्या वैयक्तिक अकाऊंटवरून उत्तर दिले आहे. 



'प्रिय अमित शाहजी, तुमच्या टीमने एक मॅच जिंकली. ते चांगले खेळले.



दोन वेगवेगळ्या गोष्टींची तुलना होऊ शकत नाही. त्याप्रमाणे स्ट्राइक आणि मॅचची तुलना केली जाऊ शकत नाही.' असे गफूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारीला बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकचा उल्लेख झाल्यानंतर गफूर यांनी स्टे सप्राइज्ड असे ट्वीट केले आहे.