मुंबई : कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची आई आणि पत्नी गेले असता... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी पत्रकारांनी दिलेल्या विचित्र वागणुकीमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे. अवंती जाधव आणि चेतनाकुल कुलभूषण जाधव यांना भेटण्याकरता इस्लमाबादमध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांना मिळालेली वागणूक ही विचित्र होतीच. पण त्याचबरोबर पाकिस्तान पत्रकारांनी त्यांना विचारलेले प्रश्न हे देखील अनपेक्षित आणि हिन वागणूक देणारे होते. 


तेथील पत्रकारांनी कुलभूषण जाधव यांच्या आईला कातिल की माँ म्हणजे खून्याची आई या शब्दांत संबोधले. तसेच पाक मीडिया आणि तेथील काही लोकांनी अशी परिस्थिती निर्माण केली की, जाधव कुटुंबियांना गाडीसाठी काही काळ उभं राहावे लागले. आणि त्या वेळेत पाकिस्तानी मीडियाने त्यांना घृणास्पद वागणूक दिली. हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हिडिओच्या रुपात व्हायरल झाला आहे. 



या व्हिडिओत ऐकू येतं की, आपके पतीदेव ने हजारों बेगुनाह पाकिस्तानीयों के खून से होली खेली इसपर क्या कहेंगी? आपके क्या जझबात है अपने कातील बेटे से मिलने के बाद? अशा पद्धतीने अपमानास्पद प्रश्न विचारण्यासाठी पाकिस्तानी मीडिया पुढे सरसावत होता. 


कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आई यांनी सोमवारी पाकिस्तानमधील भेटीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत धक्कादायक माहिती जाहीर केली. परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, भेटीदरम्यान भारतीय संस्कॄती आणि धार्मिक भावनांचा मान राखला गेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानकडून मनमानी करण्यात आल्याचे दिसून आले आहे. 


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार म्हणाले की, भेटीआधी कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आईच्या बांगड्या, टीकल्या आणि मंगळसूत्र काढण्यास सांगितले. इतकेच नाहीतर कपडेही बदलवण्यात आले. तसेच त्यांच्या चपलाही परत करण्यात आल्या नाहीत.