मुंबई :  काही दिवसांपूर्वी नाझिया अमिन मोहम्मद या पाकिस्तान स्थित गायिकेचा ' जीव रंगला' या मराठी गाण्याचा व्हिडियो सोशल मिडियावर चांगलाच गाजला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर नाझियाने भारतीयांना ७1 व्या स्वातंत्र्यदिनाची सुरेल भेट म्हणून ' ए मेरे वतन के लोगो'...  या गाण्याचा व्हिडियो फेसबुक वॉल वर भेट म्हणून दिला आहे.




  
  नाझियाने या गाण्याच्या व्हिडियोसोबत खास संदेशही लिहला आहे.  ' भारत- पाकिस्तान हे भावंडांप्रमाणे आहेत आणि ते स्वतंत्रपणे  राहत आहेत.  'जग हेच कुटुंब आहे.'  देशाच्या सीमा या मानव निर्मित आहेत.  देवाने आपल्याला या जगात एकच कुटुंब म्हणून पाठवले आहे. त्यामुळे आपण एकमेकांवर प्रेम करूया'  अशा शब्दांत नाझियाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
  
  ' ए मेरे वतन ..'   हे गाणं  लता मंगेशकर  आणि  भारतीय  स्वातंत्र्यदिन हा त्रिकुट खास आहे.  नाझियानेदेखील मला लता दीदी फार आवडतात. त्या म्युझिकल एन्जंल आहेत असे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.