Bure Din For Pakistan: पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. चीन, दुबई आणि सौदी अरबने पाकिस्तानला मदत नाकारल्यानंतर आर्थिक संकट गडद झालं आहे. पाकिस्तानकडे परदेशी कर्ज फेडण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे श्रीलंकेसारखा पाकिस्तानला दिवाळखोरीचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे भारतीय ऑटो क्षेत्र जगातील टॉप 5 बाजारांपैकी एक आहे. तर दुसरीकडे याच ऑटो क्षेत्रावरून पाकिस्तानातील स्थिती समोर आली आहे. मारुति सुझुकीसह इतर कंपन्या भारतासह पाकिस्तानात गाड्यांची विक्री करते. यामध्ये सुझुकी ते टोयोटा आणि होंडा यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे अनेक मॉडेल्स भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये आहेत. मात्र, दोन्ही देशांच्या वाहनांच्या किमतीत मोछा फरक आहे. आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानमध्ये विकल्या जाणार्‍या अशाच पाच वाहनांच्या किंमतीबद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. Suzuki Swift: मारुती स्विफ्ट तीन प्रकारात विकली जाते. पाकिस्तानात मारुति स्विफ्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. स्विफ्टच्या बेस व्हेरियंटची किंमत 31.80 पीकेआर (पाकिस्तानी रुपया) आली आहे. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 37.60 लाख पीकेआरपर्यंत पोहोचली आहे. यात मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्स पर्यायांसह 1200 सीसी पेट्रोल इंजिन आहे.


2. Suzuki Alto: भारताप्रमाणे सुझुकी अल्टोही पाकिस्तानमध्येही लोकप्रिय आहे. पाकिस्तानमध्ये त्याची किंमत 16.99 लाख पीकेआरपासून सुरू होते आणि 22.23 लाख पीकेआरपर्यंत जाते. यात 658 सीसीचे पेट्रोल इंजिन आहे. पाकिस्तानच्या अल्टोचा लूक भारतात विकल्या जाणाऱ्या अल्टोपेक्षा खूपच वेगळा आहे.


3. Suzuki Wagon R: भारतात विकल्या जाणार्‍या WagonR आणि पाकिस्तानच्या WagonR मध्ये फारसा फरक नाही. पाकिस्तानमध्ये Suzuki WagonR ची किंमत 24.2 लाख पीकेआरपासून सुरू होते आणि 28.0 लाख पीकेआरपर्यंत जाते. यात 998 सीसी इंजिन आहे. तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहेत.


4. Toyota Fortuner: टोयोटो फॉर्च्युनरची किंमत पाकिस्तानात कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. पाकिस्तानमध्ये टोयोटो फॉर्च्युनरची किंमत 1.15 कोटी पीकेआरपासून सुरू होते आणि 146 कोटी पीकेआरपर्यंत जाते. यामध्ये 2694 सीसी पेट्रोल आणि 2755 सीसी डिझेल इंजिन देण्यात आले आहे.


5. Honda City: पाकिस्तानमध्ये  सेडानची किंमत 37.7 लाख पीकेआरपासून सुरू होते आणि 44.8 लाख पीकेआरपर्यंत जाते. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर पेट्रोल इंजिन पर्याय आहेत. तुम्हाला मॅन्युअलसह सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्याय देखील मिळेल.